सन्माननीय नारित्व ....


तना-मनावरील 'बाईपणाचे' हे मना-मनाचे ओझे द्यावे झुगारून 

असा विचार अंतःकरणात डोकावतोय न डोकावतोय तोच 

प्रस्थापित व्यवस्थेनं लगेच डोळे वटारले 

त्या वटारलेल्या डोळ्यांकडे पहात मी निस्तब्ध 

'ब्र'ही न उच्चारता कसे ओळखले त्यांनी 

त्यांच्या सत्तेला नख लावू शकणारे माझे भविष्यातील पाऊल...

कशी लागली त्यांना, त्यांच्या सत्ता उतरंडीची अनामिक चाहूल...

इतकेच जर तुम्ही मनकवडे आहात तर 

का ओळखता येत नाही त्यांना माझ्यासारख्या कित्येकींच्या मनातील घालमेल...

आमची शतकानुशतकांची हातबलता, असहाय्यता...

की त्यांना जाणूनच घ्यायची नाही 

कळतंय पण वळत नाही,

खरंच आहे...                          

अन यांना पटवून तरी कास द्यावं 

की आम्हाला तुमचे स्थान, सत्ता नको

आम्हाला हवं आहे आमचं अस्तित्व, आमचं स्वत्व, 

सन्माननीय नारित्व ....

पण म्हणतात ना, झोपलेल्याला उठवता येतं,

झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार?



  - रचना माने, कोल्हापूर 

                                          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….