ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांना आठवताना….
सुप्रसिद्ध मराठी कथाकार शंकर पाटील यांची आज जन्म शताब्दी. आजपासून बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे शंकर पाटील यांचा जन्म झाला. यांचे शिक्षण तारदाळ, गडहिंग्लज व कोल्हापूर या गावी झाले. बी.ए.बी.टी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन करत असतानाच १९५७ मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली. ८ वी ते १० वी ह्या इयत्तांसाठी त्यांनी ग. वि. अकोलकर आणि ग. प्र. प्रधान यांच्या सहकार्याने ‘साहित्य सरिता' या वाचनमालेचे संपादन केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. मराठी आणि अन्य सहा भाषांतील पाठयपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९५९ मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ग्रामजीवनाचा अभ्यास केला. ग्रामजीवनाचा तो अनुभव त्यांनी १९६४ मध्ये ‘टारफुला’ या कादंबरीद्वारे शब्दबद्ध ...
खूप छान 👍👌
ReplyDeleteसुंदर....
ReplyDeleteमस्त 👌
ReplyDeleteमस्तच 👌
ReplyDelete👌
ReplyDelete